कहाणी शापित जहाजाची

तुम्ही डचमॅन फ्लाईंग शीपबद्दल ऐकलं आहे का? हे झपाटलेलं जहाज असून गेल्या 400 वर्षांपासून समुद्रात भटकत असल्याचं बोललं जातं. हे जहाज दिसणं अपशकुन मानला जातो. तसंच समुद्रात विहार करणार्‍या जहाजातल्या लोकांना हे जहाज दिसलं तर त्यांचं आणि जहाजाचं वाईट होतं, असंही म्हटलं जातं. या जहाजाशी संबंधित अनेक चित्रपट तसंच मालिकाही आल्या आहेत. फ्लाईंग डचमॅन जहाज बघितल्याचा दावा आजवर अनेकांनी केला आहे. अर्थात हे दावे किती खरे आणि किती खोटे हे कोणीच सांगू शकत नाही. निकोलस मॉन्सर्रेट या प्रसिद्ध लेखकानेही असा दावा केला होता. दुसर्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात हे जहाज दिसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. डचमॅन जहाज एका वादळात अडकलं आणि बुडलं. या जहाजातल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या सर्व प्रवाशांना लवकर घरी पोहोचायचं होतं. त्याामुळे या सर्व लोकांनी मरताना जहाजाला शाप दिला. तेव्हापासून हे जहाज समुद्रात भटकत असल्याचं बोललं जातं. अर्थात या जहाजाचं गुपित नेमकं कोणालाही माहीत नाही. हे जहाज अस्तित्वात आहे किंवा नाही हेही सांगता येणार नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा