जगातली सर्वात शांत खोली

अनेकांना शांत वातावरण आवडतं. वाहनांचा, टीव्हीचा आवाज नकोसा वाटतो. खूप गोंधळ, गडबड झाल्यानंतर शांतता हवीहवीशी वाटू लागते. शांत वातावरणात चित्त एकाग्र होतं. तुम्हालाा शांतता आवडत असेल तर जगातल्या अत्यंत शांत खोलीत रहायला हरकत नाही. चला तर मग या खोलीविषयी जाणून घेऊ. आता ही खोली नेमकी कुठे आहे, असा प्रश्‍वन तुम्हाला पडला असेल. तर ही खोली मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कार्यालयात आहे. या खोलीची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे इथे बाहेरचा आवाज येत नाही. इथल्या शांततेमुळे पिन पडल्याचा आवाजही येतो. इतकंच नाही हृदयाचे ठोकेही ऐकू येतात, असं म्हटलं जातं. याच कारणामुळे ही खोली नेहमीच चर्चेत असते. या खोलीत चालल्यास हाडं घासली जात असल्याचा आवाजही ऐकू येतो, असंही म्हणतात. अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये मायक्रॉसॉफ्टचं कार्यालय असून या कार्यालयात ही विशेष खोली तयार करण्यात आली आहे. या खोलीतल्या आतही आवाज येऊ नयेत यासाठी विशेष उपकरणं बसवण्यात आली आहेत. ही खोली हुंडराज गोपाल नामक डिझायनरने तयार केली असून या खोलीत बसल्यानंतर वेगळाच अनुभव मिळतो. या खोलीत प्रवेश केल्यानंतर वेगळंच वाटतं. आपण बहिरे झालो आहोत की काय, असं वाटतं. ही खोली तयार करण्यासाठी जवळपास दीड वर्षं लागलं. तसंच या खोलीत कोणताही आवाज येत नसल्यामुळे आपल्याला बहिरं झाल्यासारखं वाटतं, असं हुंडराज गोपालचं म्हणणं आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा