योगायोग 9/11 चा

11 सप्टेंबर 2001 या दिवशी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेचा उल्लेख 9/ 11 असाच केला जातो. या हल्ल्याला 20 पूर्ण झाली. 9/11 चा उल्लेख करताच प्रत्येक अमेरिकन नागरिक भावूक होतो. हा दिवस म्हणजे अमेरिकेवरची भळभळती जखम आहे. 9/11 या दिवशी अनेक मुलांचा जन्म होतो. अशीच एक घटना दोन वर्षांपूर्वी घडली. एका बाळाच्या जन्माने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या बाबतीत अनोखा योगायोग घडला. जर्मनटाउनमधल्या एका रुग्णालयात 9/ 11 च्या रात्री एका मुलीचा जन्म झाला. ही मुलगी बरोबर 9 वाजून 11 मिनिटांनी जन्मली. महत्त्वाची बाब म्हणजे या बाळाचं वजन 9 पाउंड 11 औंस म्हणजे 4.4 किलो होतं. म्हणजे 9/11 ला रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी 9 पाउंड 11 औंस वजनाची मुलगी या रुग्णालयात जन्मली. या योगायोगाबद्दल सर्व जण आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. हा एक चमत्कार असल्याचं मुलीच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. क्रिस्टिनिया असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. मोठेपणी क्रिस्टिनियाला या तारखेचं महत्त्व सांगितलं जाणार आहे. क्रिस्टिनियाचा जन्म हा आम्हा सर्वांसाठी आशेचा किरण असल्याचं तिची आई कॅमोट्रियन ब्राउन सांगते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा