रेखा जरे हत्येची केस मागे घेण्यासाठी काही जणांकडून मध्यस्थीचे प्रयत्न-मध्यस्थीचे प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करावी- रुणाल जरे

अहमदनगर- रेखा जरे हत्याकांडाची केस मिटविण्यासाठी काही पत्रकार व मध्यस्थांकडून प्रयत्न सुरू असून, कोट्यावधी रुपयांची लालसा दाखवून केस मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. तरी संबंधित लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात जरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गु.र.नं.478/2020 भा.दं.वि. कलम 302, 120 ब, 34 नुसार मे. सेशन कोर्टात एस.सी. नं.156/2021 कोर्ट नं.1 मध्ये प्रलंबित आहे. तसेच मुख्य आरोपी बाळ ज. बोठे व इतर आरोपी यांची केस मे. कोर्टात प्रलंबित असून सदर प्रकरणात काही पत्रकार व काही मध्यस्थी लोक मला भेटून केस मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. वेळोवेळी मला काही लोकांना मध्यस्थी घालून मिटींग घडवून आणण्यासाठी देखील पैसे समोरील व्यक्तीकडून घेण्याचा प्रकार चालू झाला आहे.

अशा परिस्थितीत माझ्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. माझे वकील सचिन पटेकर यांनादेखील यापुढे केस मिटविण्याच्या दृष्टीने दबाव तंत्र वापरण्यास समोरील व्यक्ती मागेपुढे पाहणार नाही. ज्याप्रमाणे सदरील व्यक्तींनी माझ्या आईचा जीव घेतला त्याप्रमाणे केस मिटविण्यासाठी ते माझ्या जिवाचेही काही बरेवाईट करु शकतील याची मला खात्री झालेली आहे. अशा परिस्थितीत माझे कुटुंबाची बदनामी करण्याचा डाव चालू केला आहे. त्यामुळे उचित व्यक्तीवर योग्य ती चौकशी करुन कारवाई करणे महत्वाचे आहे. तसे न झाल्यास केस व त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. तसेच प्रस्तुत केस मिटविणारे मध्यस्थी असे सांगू लागले आहे की, तुझ्या आईच्या नावे सावेडी भागात जागा असून त्याची किंमत काही कोटीमध्ये आहे अशी लालसा दाखविली व कागदपत्रे देतो, तू तुझी केस मागे घे, अशी लालसा दाखवून मध्यस्थी करत आहेत. तरी संबंधित लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जरे यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा