राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘योगा प्रोटोकॉल’ वेबिनार

अहमदनगर – आयुष, महिला बालविकास मंत्रालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत पाच मिनिट योगा प्रोटोकॉल (ध इीशरज्ञ) सबंधी ये वेबीनार झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारिरीक शिक्षण विभागाचे प्रा.मगेश ठोमके होते, त्यांनी योग, ध्यानधारणा, प्राणायाम व पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले. प्र. प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे कार्यक्रमास उपस्थित होते. प्रा. ठोमके यांनी सांगितले की महिला सबलीकरणासाठी योग्य आहाराबरोबरच नित्य ताडासन, कटी चकासन अधिकासन, पदोतानासन, नाडीशोधन, प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम केल्याने प्रकृती सुदृढ राहते व आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपले जगणे सुंदर होते. त्यासाठी जीवनात योगाभ्यास एक मौलिक कला असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

उपप्राचार्य प्रा.नासिर सय्यद यानी महिलांचे आरोग्यावर पारिवारिक व सामाजिक विकास अवलंबून असल्याने सेवकानी योगाभ्यासाला जास्त महत्व देण्याबाबत आवाहन केले, वेबिनार कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा.आर. व्ही. बर्वे तसेच आय क्य.ए.सी. चे समन्वयक प्रा. एम. आर. खान उपस्थित होते. सदर कार्यक्रमात 125 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक डॉ. राजाराम कानडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुश्री भागवत यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. गणेश विधाटे यांनी केले तर आभार डॉ. एस. एस. केकडे यांनी मानले. प्रा. विलास एलके, प्रा. निर्मला दरेकर, प्रा.एस. एस. ठुबे यांचे सहकार्य लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा