स्कायब्रिज गृहप्रकल्पात गणशोत्सवाचा उत्साह, विविध कार्यक्रमांची रेलचेल

अहमदनगर- बुरुडगाव रोडवरील स्काय ब्रिज गृहप्रकल्पात प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असून याठिकाणी गणेश चतुर्थीला विधीवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जितेंद्र गुगळे यांनी सपत्निक गणपतीची आरती केली. स्काय ब्रिजमधील सर्व फ्लॅट धारकांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे ऋणानुबंध तयार झाले आहेत. यातूनच गणेशोत्सव सर्वजण एकत्रित साजरा करीत असून दररोज सकाळी तसेच सायंकाळी आरती तसेच विविध सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत, अशी माहिती सिध्दार्थ छाजेड यांनी दिली.

स्कायब्रिज केवळ एक गृहप्रकल्प न राहता एक मोठा परिवार बनला आहे. विविध सण उत्सव याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महिला मंडळाने लेडीज क्लबच्या माध्यमातूनही विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आबालवृध्दांचे लाडके दैवत गणरायाचे आगमन स्कायब्रिजमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरले आहे. सर्व परिवारांनी एकत्र येत गणपतीची स्थापना करून आकर्षक सजावट केली आहे. लहानमोठी सर्व मंडळी उत्साहात गणपतीच्या पाहुणचारात दंग झालेली आहेत. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून लहानग्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येत आहे. उत्सव काळात दहाही दिवस अशा कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा