पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्यामुळे गरजूंना एक नवी उभारी- दत्तात्रय जोग 

गणेश उत्सव निमित्त पद्मशाली सोशल फाउंडेशनच्यावतीने डोंबारी खेळ करण्यार्‍या मुलांना मिष्टान्न भोजन

अहमदनगर – कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून जिवन जगणेही कठीण बनले आहे. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वांनी एकजुटीने सर्वांनी या संकटसमयी उभे राहिले पाहिजे. अनेक असे कुटुंब असे कुटुंब आहेत ते भटकंती करून आपले जीवन जगतात, कोरोनामुळे भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे, ही परिस्थिती ओळखून पद्मशाली सोशल फाउंडेशनच्यावतीने त्यांना जो मदतीचा हात मिळत आहे तो त्यांच्या एक नवी उभारी आहे, असे प्रतिपादन दात्तात्रय जोग यांनी केले. पद्मशाली सोशल फाउंडेशन व जोग परिवाराच्यावतीने गणेश उत्सव निमित्त डोंबारी समाजातील 125 मुलांना एकवेळचे जेवण देण्यात आले. त्याप्रसंगी श्री. जोग बोलत होते. यावेळी गणेश लक्षेट्टी, बाळासाहेब चिलवर, दत्तात्रय मादास, यशवंत वन्नम, राजेंद्र जोग, आकाश जोग, संदीप बोडखे, श्रीकांत म्याना, अमित सुंकी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पद्मशाली सोशल फाउंडेशनचे प्रमुख गणेश लक्षेट्टी म्हणाले, डोंबारी समाजातील कुटुंब विविध खेळ, शारीरिक कसरती करून मिळणार्‍या पैसे मधून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह भागवत, पण सध्याच्या परिस्थितीत सर्व खेळ बंद असून हाताला दुसरे कुठलेही काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, माणुसकीचा धर्म म्हणून आणि एक दिलासा म्हणून आज पद्मशाली सोशल फाउंडेशन व जोग परिवारच्यावतीने पालावरची शाळा (बाल संस्कार केंद्र) मधील बालकांना एकवेळचे मिष्टान्न भोजन देण्यात आले आहे. मागील 4 वर्षापासून विविध उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती निमित्त जेवण देण्याचे काम करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. यावेळी युवराज गुंड यांनी डोंबारी समाजातील कुटुंब व बालकांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे या कुटुंबांवर मोठे सकंट निर्माण झाले आहे. आणि या समाजातील लोकांना कुठे काम ही मिळत नसल्याने परिस्थिती खूप बिकट बनली आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे गावो-गावी जाऊन डोंबारीचे खेळ करणे, जत्रा यात्रेमध्ये खेळणी विकणे, पण सध्या कोरोना या महामारीमुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला आणि त्यांच्यावर ही परिस्थिती निर्माण झाली. आज त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि अनेक मित्रमंडळ यांच्या मदतीसाठी काम करत असल्यामुळे यांच्यावर ओढून आलेले संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. आज पद्मशाली सोशल फाउंडेशन व जोग परिवाराच्यावतीने हा सामाजिक उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्या हातातून घडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तेथील मुलांनी विविध खेळ सादर करून सर्वांचे मने जिंकली. तसेच याप्रसंगी सर्व मुलांना तुलसी प्रिंटवेल अँड पब्लिकेशन यांच्यावतीने नित्य संस्कार या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी विश्वास जोग, संदीप बोडखे, अजय लयचेट्टी, शुभम सूंकी, राजू तडका, आकाश अरकल, गणेश अवधूत, मयूर जिंदम, अनिल अलवाल, श्रीनिवास बुरगुल आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज गुंड यांनी केले. तर आभार शुभम सुंकी यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा