ओढवलेल्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची गरज – अलका रेणावीकर-कुलकर्णी

अहमदनगर- आयुष्याच्या खडतर प्रवासात स्वतः वर विश्वास ठेऊन ओढवलेल्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची गरज असते, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अलका रेणावीकर-कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या ऋषिपंचमीच्यानिमित्ताने त्यांचा स्नेह 75 या ग्रुपच्यावतीने आदर्श माता हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्नेह 75 या ग्रुपचे अशोक नवले, प्रकाश गुगळे, सुरेश मुनोत, ईश्वर सुराणा, छाया कुलकर्णी-देवचके, डॉ. स्मिता केसरी-बडवे, रजनी ढोरजे-भंडारे, किशोर रेणावीकर, जयंत जाधव, दिलीप कानडे, डॉ. प्रवीण रानडे, दिलीप अकोलकर, अतुल तांबोळी, मिलिंद भारदे, दिलीप भंडारी, प्रमोद पोवार, विश्वनाथ पोंदे, दिनेश गुगळे, धनंजय रामदासी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अलका रेणावीकरकुलकर्णी म्हणाल्या कि, मी स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवला. मी कधीही भविष्य किंवा पत्रिकेची कास धरली नाही. एकटीने आलेल्या सर्व प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. यात मुलांची मोलाची साथ मिळाली. आयुष्यात अनेक संकटे येत असतात मात्र कुणाची साथ मिळाली नाही म्हणून खचून जाऊ नका. धैर्याने त्याचा सामना करा, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण रानडे यांनी केले तर आभार अशोक नवले यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा