आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन – काय खाणे टाळावे? (पांढरी विषे)

वनस्पती तूप – खरतर याला वनस्पती तूप का म्हणतात, असा मला प्रश्न पडतो. कारण हे तूप अजिबात नाही. वनस्पती तूप म्हटल्यावर सर्वसामान्यांना अगदी ते नैसर्गिकच तूप वाटते, म्हणून उपवासाच्या दिवशीही अन्नपदार्थ शिजविण्यासाठी किंवा तळण्यासाठी याचा वापर करतात. परंतु हे आरोग्यास घातक आहे. हे तूप नैसर्गिक नसून, खाद्य तेलापासून रासायनिक प्रक्रियेने बनविल हॅड्रोजनेटेड ऑईल्स किंवा वनस्पती तूप असे म्हणतात.

वनस्पती तूप बनविण्याची प्रक्रिया – सरकी तेल, रेपसीड तेल, मोहडा तेल, सालसीड तेल, मोहरी तेल, धुपा तेल, सोयाबीन तेल, भात-तूस तेल, मका तेल, फुलवारा तेल अशा अनेक प्रकारच्या तेलांपासून हे अनैसर्गिक कृत्रिम घनीभूत तूप बनविले जाते. या तेलामध्ये सायट्रिक ऍसिड घालून तापवितात. नंतर कॉस्टिक सोड्याने त्याला धुऊन त्याचा रंग पांढरा केला जातो. अजून शुभ्रपणा येण्यासाठी आम्लमाती व कोळशाच्या सान्निध्यात पुन्हा तेल तापविली जातात. त्यानंतर ब्लीचिंग करून शुभ्रपणा वाढविला जातो. या प्रक्रियेमुळे तेलांमधील आवश्यक असलेली सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात. या तेलांना घट्टपणा येण्यासाठी यामध्ये हायड्रोजन गॅस सोडतात. या प्रक्रियेसाठी निकेल धातू वापरला जातो, जो आरोग्यास अतिशय घातक असतो. यानंतर कृत्रिम घनीभूत अनैसर्गिक तूप बनते, परंतु याचा वास नष्ट करण्यासाठी पुन्हा रासायनिक प्रक्रिया करून हे तूप 4 ते 5 तासांपर्यंत 240 अंश ते 260 अंश सेंटीग्रेडला तापवले जाते व सर्वांत शेवटी अशा पद्धतीने अनैसर्गिक वनस्पती तूप बनते.

गुणधर्म – वरील पद्धतीने अनैसर्गिक वनस्पती तूप बनल्यानंतर त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात व उरते ते फक्त निःसत्त्व घन तूप! या तुपात कृत्रिम पद्धतीने जीवनसत्त्व ’अ’ व ’ड’ सर्वात शेवटी मिसळले जाते. परंतु हे तुप पचनास जड झाल्या मुळे शरीरावर त्याचा अतिरिक्त भार पडतो. पर्यायाने कृत्रिम जीवनसत्त्वांचा काहीही उपयोग होत नाही. हे तूप म्हणजे एकप्रकारे संपृक्त, स्निग्ध पदार्थ की जो सामान्य तापमानावर घन स्वरूपात राहतो. हे तूप सामान्य तापमानामध्ये घन स्वरूपात राहिल्यामुळे सेवन केल्यानंतर शरीरात देखील रक्तवाहिन्यांमध्ये घन स्वरुपात राहते.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा