कुरकुरीत ब्रेड भजी

मित्रांनो, संध्याकाळी चहासोबत तुम्ही छानपैकी ब्रेडची भजी खाऊ शकता. ही कुरकुरीत भजी संध्याकाळच्या वेळी पोटभरीची ठरतील.

सामग्री  – चार सामग्री: ब्रेड स्लाईस, अर्धा कप दही, पाउण कप बेसन, वाटलेली हिरवी मिरची एक चमचा, थोडी कोथिंबिर, चवीनुसार मीठ, तेल

कृती    –   ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्या. उरलेल्या ब्रेडचे छोटे तुकडे करून घ्या. आता एका भांड्यात बेसन, मिरची, दही आणि मीठ घालून घट्टसर पीठ बनवून घ्या. त्यात ब्रेडचे तुकडे घाला. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. आता चमच्याने हे मिश्रण हलकेच कढईत सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. कुरकुरीत आणि खमंग ब्रेड भजी चहासोबत खा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा