हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा नेत्रदानाचा संकल्प

अहमदनगर – विविध सामाजिक कार्यात योगदान देणार्‍या हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. जिल्हा रुग्णालय नेत्र विभाग, फिनिक्स सोशल फाऊंडेशन व हर दिन मॉर्निंग ग्रुपच्यावतीने भिंगारला 36 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी नेत्रदानाचे संकल्पपत्र भरुन नागरिकांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी हर दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नेत्र समुपदेशक सतीश आहिरे, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, सुधाकर चिदंबर, श्रीरंग देवकुळे, डॉ. अशोक चेंगडे, अशोक भुजबळ, विकास निमसे, हरिश साळुंके, मनोहर पाडळे, सुरेंद्रसिंह सोहेल, प्रविण परदेशी, रमेश कोठारी, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, विलास दळवी, संतोष लुणिया, नितीन भिंगारकर, सुंदर पाटील, मिलिंद क्षीरसागर, प्रसाद भिंगारदिवे, वैभव गुगळे, अनंत सदलापूर, आदिनाथ रासकर, आनंद भणगे, राजू शेख, अशोक पराते, अनिल जाधव, नाना नागपुरे, अशोक लिपारे, नाथा भिंगारदिवे, अजय आठवले, संजय भिंगारदिवे, प्रविण भोसले, उषा ठोकळ, प्रांजली सपकाळ, मिनाक्षी खोगरे आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, शरीर नश्वर असून, मरताना नेत्रदान करुन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण होणार आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळ ही काळाची गरज असून, अनेक दिव्यांग अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. भारतीय समाजात नेत्रदान व अवयवदान संबंधी अंधश्रध्दा व गैरसमजूती जनजागृतीच्या माध्यमातून दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनने अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले. नेत्रदान समुपदेशक सतीश आहिरे यांनी मरणोत्तर नेत्रदान जास्तीत जास्त होण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली जात असून, सामाजिक संघटनांचा सहभाग घेतला जात आहे. हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी नेत्रदानाचे संकल्प अर्ज भरुन समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नेत्रदानाबद्दलची माहिती दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा