विखे पाटील फार्मसीचे प्रा. गणेश बरकडे यांना उत्कृष्ट युवा संशोधक पुरस्कार जाहीर

अहमदनगर- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कॉलेज ऑफ फार्मसी, विळदघाट, नगर येथे कार्यरत असलेले प्रा. गणेश बरकडे यांना नॉव्हेल रिसर्च अकॅडमी, पोंडुचेरी यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा ‘बेस्ट यंग रिसर्च’ अवॉर्ड-2021 साठी निवड झाली. पुरस्कार हा 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमीत्ताने ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शैक्षणिक व संशोधन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या युवा संशोधकाला जाहीर करण्यात येतो. प्रा. बरकडे यांचे आत्तापर्यंत 10 संशोधन शोधनिबंध प्रकाशित आहेत. तसेच त्यांना यापुर्वी ’बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड-2016’ संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आहे. ते सध्या महाविद्यालयातील प्रा. डॉ. रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग या विषयावर पी.एच.डी. करत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा