इनरव्हील क्लब, अहमदनगरतर्फे डॉ. देशपांडे हॉस्पिटलमध्ये स्त्री जन्माचे स्वागत

अहमदनगर- इनरव्हील क्लब अहमदनगरतर्फे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल येथील ज्या गर्भवती महिलांना मुलगी जन्माला आली त्यांचे क्लबच्यावतीने कपडे, खाऊ, औषधोपचाराचे साहित्य वाटप करुन सत्कार केला. डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रेरणेने क्लबच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा बरमेचा व सचिव कल्पना मुथ्था यांनी येथील म हिलांना क्लबचे कार्याची माहिती देवून स्त्री सबलीकरणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमासाठी रेश्मा चारनिया यांनी राजगीरा लाडू तसेच आशा पितळे यांनी नवजात शिशुंसाठी झबले टोपले व सॉक्स तसेच ललिता बलदोटा यांनी खजुराचे वाटप केले. उपक्रमांसाठी क्लबच्या सदस्या वंदना गारुडकर, राखी चंगेडिया, नूतन चोरडीया, आशा पितळे, दमयंती गुंजाळ, प्रेसिडेन्ट सुवर्णा बरमेचा, सचिव कल्पना मुथा उपस्थित होत्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा