साखरेचे उत्पादन घटणार

आगामी काळात साखरेचे उत्पादन काही प्रमाणात कमी होणार आहे. साखरेसाठी लागणार्‍या उसाचा वापर इथेनॉल निर्माण करण्यासाठी वाढणार असल्यामुळे हा परिणाम होणार असल्याचे केंद्रीय अन्न सचिव सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले. ब्राझीलनंतर भारत जगातील साखर उत्पादन करणारा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. भारत आपल्या गरजेपेक्षा जास्त साखर निर्माण करतो. त्यामुळे साखरेला भाव मिळत नाही. यासाठी इथेनॉल निर्मिती वाढविण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यामुळ इथेनॉल निर्माण होण्याबरोबरच साखरेचे अतिरिक्त उत्पादन टळते. सिंह यांनी सांगितले की, इथेनॉलचे उत्पादन केले नसते तर साखरेचे 31 दशलक्ष टन इतके उत्पादन झाले असते. मात्र आता त्याऐवजी साखरेचे 30.50 दशलक्ष टन एवढे उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षी दोन दशलक्ष टन उसापासून इथेनॉल तयार करण्यात आले होते. आता हे प्रमाण वाढवून 3.5 दशलक्ष टन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा