औद्योगिक उत्पादनाची भरारी

जुलै महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली. या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन तब्बल 11.5 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन उणे 10.5 टक्के इतके घसरले होते. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर आता वाढलेले औद्योगिक उत्पादन जास्त भासत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. असे असले तरी उत्पादन वेगाने पूर्वपदावर येत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत.

जुलै महिन्यामध्ये खान क्षेत्राची उत्पादकता 19.5 टक्क्यांनी वाढली आहे तर वीज उत्पादन 11.1 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यानंतर देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यानंतर औद्योगिक उत्पादनावर त्याचा काळ परिणाम झाला होता. आता परिस्थिती वेगाने पूर्ववत होण्याची लक्षणे दिसून येत आहेत. पहिल्या तिमाहीच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली असून पहिल्या तिमाहीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न 20.1 टक्क्यांनी वाढले आहे. पहिल्या तिमाहीमध्ये करोनाची तिसरी लाट आली होती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा