नव्या कंपन्यांची नोंदणी वाढली

उद्योग करणे सुलभ होत असल्यामुळे सरलेल्या 2020-21 वर्षांत नव्या कंपन्यांची नोंदणी 26 टक्क्यांनी वाढली. या वर्षामध्ये तब्बल 1.55 लाख इतक्या नव्या कंपन्यांची नोंदणी झाली असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्राफिक्स डाटा सायन्सेस या संस्थेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 3,209 कंपन्यांची नोंदणी झाली. परिस्थिती सुधारल्यानंतर मार्च 2021 मध्ये तब्बल 17,324 नव्या कंपन्यांची नोंदणी झाली. 2019-20 या वर्षात केवळ 1 लाख 22 हजार कंपन्यांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षी करोनाचे संकट असूनही नव्या कंपन्यांच्या नोंदणी वाढ झाली असल्याचे दिसून येते. या अहवालातील माहितीनुसार गेल्या वर्षी मॅन्युफक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांची नोंदणी 45 टक्क्यांनी वाढून 333,483 इतकी झाली.

सेवा क्षेत्रातील कंपन्यांची नोंदणी 16 टक्क्यांनी वाढली आहे. नवीन उद्योजक कृषी आणि तत्सम क्षेत्रामध्ये कंपन्यांची नोंदणी करीत असून गेल्या वर्षी या क्षेत्रात नोंदलेल्या कंपन्यांची संख्या 112 टक्क्यांनी वाढली आहे. ग्राफीक्स डाटा सायन्सेस या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन रामास्वामी यांनी सांगितले की, भारतामध्ये कंपनीची नोंदणी करणे आणि कंपनी चालविणे अधिक सुलभ झाले असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. कंपन्यांची नोंदणी सूलभ व्हावी, कंपन्या चालविणे सुलभ व्हावे, करप्रणाली सुलभ असावी, कंपन्यांना भांडवल लवकर उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत आगेकूच करीत असल्याचे दिसून येते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा