कोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा

साहित्य – मोदकाचे सारण, पाणीपुरीच्या पुर्‍या, कोकोनट मिल्क/क्रिम, साखर. सारणासाठी – फ्रेश नारळ, किसलेला गुळ, खसखस, इलायची पावडर, मिक्स ड्राय फ्रुट भिजवून बारीक कापून घेतलेले, भिजवलेले बेदाणे/मनुका.

कृति – तूपावर थोडी खसखस भाजून नारळाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतावे, गुळ, ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतावे. हे सारण आता पुर्‍यांमधे भरावे. त्यानंतर सारण थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावे.

कोकोनट सॉससाठी – कॅनमधला थिक कोकोनट क्रिम सॉस नीट घोटून त्यात साखर आणि इलायची पावडर कुटून घालावी, नीट हलवला आता हा झाला सारण पुरीचा सॉस तयार ! आता पाणीपुरीची पुरी वरून फोडून घ्या, त्यात प्रथम सारण घाला, बर्‍यापैकी भरगच्च भरलं पाहिजे, एखादा चमचा सॉसला जागा राहिल इतकं भरा. आता त्यावर बनवलेला कोकोनट सॉस घाला, झाला कोकोनट गोलगप्पा तयार!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा