आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन- काय खाणे टाळावे? (पांढरी विषे)

मीठ – त्यामुळे शरीरात हळूहळू मिठाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. परिणामी विविध आजारांची निर्मिती होते. तसेच लहान मुलांबरोबरच सर्वांनाच बाजारातील बटाटा वेफर्स खायची सवय असते. हे वेफर्स जास्त काळ टिकण्यासाठी यामध्ये मिठाचा वापर हा पाचपट अधिक प्रमाणात केलेला असतो. त्यामुळे आरोग्याची हानी होते. वेफर्स खायचेच असतील, तर घरी बनविलेले खावेत. उपयोग : मिठाचा जर योग्य प्रमाणात वापर केला, तर अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते.

उदाहरणार्थ – 1. ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते. 2. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिल्यास कृमी शौचावाटे पडतात. 3. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते. 4. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

दुष्परिणाम – मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतड्यातील श्लैष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वांग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्वतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतड्यामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शिअम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.

पर्यायी पदार्थ – आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजारांची लागण होते. थायरॉईड ग्रंथीमधून बाहेर पडणारे थायरॉक्सिन हे हॉर्मोन तयार होण्यासाठी आयोडिनची जरुरी असते. याचे दररोजचे आवश्यक प्रमाण 150 मिलिग्रॅम इतके आहे. याच्या अभावाने थायरॉईड गॉयटर नावाचा विकार होतो. म्हणून रुग्ण घाबरून आयोडिनयुक्त मीठ जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करतात. परंतु नैसर्गिक पदार्थांमधूनही आपल्याला आयोडिन भरपूर प्रमाणात मिळते. उदाहरणार्थ : अननस, सफरचंद, बटाटा, टोमॅटो, लसूण, शिंगाडा, सागरी व पाण्याकाठच्या वनस्पती जसे घोळ, कमलकंद, सागरी मासे. या सर्वांमधून आयोडिनची गरज भागते. म्हणून दिवसांतून चार ग्रॅम्सपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा