पिगकासोचे पेंटीग-किंमत दोन लाख

पाब्लो पिकासो आणि त्याची अनोखी चित्रे जगप्रसिद्ध आहेत. पिकासोच्या चित्रांना मोठीच किंमत मिळत असते. मात्र, आता ‘पिगकासो’ची चित्रेही मोठ्या किमतीत विकली जात आहेत.

हा ‘पिगकासो’ म्हणजे एक डुक्कर असून त्याने काढलेल्या चित्रांमुळे तो 50 लाख 23 हजार रुपयांचा मालक बनलेला आहे. त्याच्या एका चित्राला अलीकडेच 2 लाख 36 हजार रुपयांची किंमत मिळाली आहे. पिगकासो हा आफ्रिकेत राहणारा डुक्कर आहे. तोंडात ब्रश धरून कॅन्व्हासवर रंगांचे फराटे उडवण्यात तो कुशल आहे. थायलंडमधील काही हत्तीही सोंडेत ब्रश धरून चित्रे काढतात. आफ्रिकेतच एक जिराफही असेच चित्रच बनवतो. काही ठिकाणी माकडांसारखे काही प्राणीही अशीच चित्रे रंगवत असताना दिसून येते. मात्र, एखादे डुक्करही असेच चित्रकलेत कुशल असेल हे कुणाला वाटले नव्हते. हा ‘पिगकासो’ काही मिनिटांमध्येच सुंदर चित्रे काढतो. अर्थातच ही चित्रे म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे यथेच्छ उडवलेले फर्राटेच असतात. मात्र, तरीही त्यामध्ये कला दिसत असल्याने अनेक लोक हे ‘मॉडर्न आर्ट’ मोठ्या किमतीत खरेदी करतात. आता त्याचे एक चित्र स्पेनच्या व्यक्तीने 2 लाख 36 हजार रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा