त्रिदल सैनिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर खोटी तक्रार केल्याचा आरोप

सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई मागणी

अहमदनगर- जिल्हा सैनिक कार्यालय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे आजी माजी सैनिकांच्या परिवाराशी उद्धटपणे वागत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्रिदल सैनिक संघटनेच्या पदाधिकार्‍यां विरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. त्रिदल सैनिक संघटना ही धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणीकृत आहे ही संघटना माजी सैनिक परिवारांचे शेतीविषयी रस्ता विषयी भाऊबंदकीचे कोर्ट केसेस तसेच माजी सैनिकांचे कुटुंब अंतर्गत प्रश्न समाजाने सोडवण्याचे काम करत आहे सदर कामे व वाद हे वर्षानुवर्षे रखडलेल्या असताना ते मिटवण्यामध्ये संघटनेला यश आले आहे व माजी सैनिकांचे विविध अडीअडचणी संघटनेमार्फत सोडविण्याचे काम चालू आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या सैनिक आणि सैनिक कुटुंबांच्या अडी-अडचणी सोडवणूक करण्याची जबाबदारी जिल्हा सैनिक कार्यालय यांची आहे सैनिक परिवार माजी सैनिक विधवा वीरपत्नी व वीर माता यांनी संघटनेकडे लेखी तक्रार करून सैनिक कल्याण कार्यालय कोणतेही प्रकारचे सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविली आहे व विधवा महिलांची वीरपत्नी व वीर माता व त्यांचे पाल्य व त्यांचे आई-वडील मयत झाले अशा सैनिक परिवाराशी असंविधानिक शब्दाचा प्रयोग करून हुसकावून लावतात ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

सैनिक परिवाराकडून संघटनेकडे आलेल्या तक्रारीची संघटनेतील पदाधिकार्‍यांनी विचारपूस केल्यानंतर सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी संगनमतांनी पोलीस स्टेशनमध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात खोटी तक्रार देऊन माजी सैनिकांचे मनोबल मोडण्याचा कट रचला आहे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कोणतीही शहानिशा चौकशी न करता पोलिस स्टेशनला तक्रार दिली. ही बाब निंदनीय व चुकीची आहे, म्हणून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सैनिक सेवा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप लगड, कोर कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी, कार्य अध्यक्ष एस. के आठरे, मेजर चव्हाण, अशोक गोरे, मेजर कापरे, संजय पाटेकर, शरद पवार, संजय म्हस्के, प्रकाश परकाळे, दादासाहेब शेंडकर, महादेव खाकाळ, रमेश काळे, कांबळे सर, वाबळे सर, आप्पासाहेब कदम, नवनाथ मोटे, महिला अध्यक्षा श्रीमती कातोरे, भावना शिंदे, शरद चव्हाण, तुकाराम डफळ, बबनराव पवार, अनिल लगड, भाऊसाहेब जाधव, सुसे ताई, साठे ताई आदी सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा