अहमदनगरमध्ये ‘महावीर ई बाईक्स’ येथे ‘प्युअर ईव्ही’ च्या ई बाईक उपलब्ध

अहमदनगर- वायू प्रदूषण, पेट्रोलियम इंधनाचे वाढते दर अशा अनेक कारणांमुळे ईलेक्ट्रीक वाहनांना महत्त्व आले आहे. सरकारही अशा वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. प्रदूषण टाळणारी व चार्जिंगच्या कमी खर्चात अधिक मायलेज देणारी ई दुचाकी घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नगरमध्ये महावीर ई बाईक्सने अशा ई दुचाकींची मोठी रेंज उपलब्ध करून दिली आहे. चांगली सेवा व दर्जेदार ई दुचाकींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त नव्या युगातील ई दुचाकी खरेदी करून ग्राहक पर्यावरण संवर्धनाचा श्रीगणेशा करु शकतील असा विश्वास महावीर ई बाईक्सचे संचालक ऋषभ दुगड यांनी व्यक्त केला. अहमदनगरमध्ये आनंदधाम परिसरातील महात्मा फुले चौकात महावीर ई बाईक्स येथे हैदराबाद येथील नामांकित प्युअर ईव्ही या कंपनीच्या ई स्कूटर तसेच बॅटरीवरील सायकल उपलब्ध आहेत.

प्युअर ईव्ही कंपनीची नगर जिल्ह्याची एकमेव डिलरशिप महावीर ई बाईक्सकडे आहे. ई स्कूटरचे चार मॉडेल सहा आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध आहेत. ई प्लुटो, ई प्लुटो 7 जी, एंट्रस प्लस, मोपेड ही चार मॉडेल हटके लूक असणारी असून तरूणाईसह सर्व वयोगटाला या स्कूटरव्दारे आरामदायी राईडचा आनंद मिळणार आहे. याशिवाय रेग्युलर तसेच बॅटरीवर चालणारी इट्रॉन प्लस सायकलही दालनात आहे. सर्व दुचाकींसाठी मजबूत लिथियम बॅटरीचा वापर केलेला असून बॅटरीवर तीन वर्षांची वारंटी देण्यात येते. किमान चार तास बॅटरी चार्जिंग केल्यावर सुमारे 70 ते 120 किलोमीटर बिनधास्तपणे दुचाकी चालू शकते. पेट्रोलच्या तुलनेत या चार्जिंगचा खर्च अतिशय कमी आहे. 15 ते 20 पैसे प्रतिकिलोमीटर खर्चात या ई दुचाकीची राईड करता येते. या वाहनांसाठी नामांकित कंपन्यांचे फायनान्स सुविधाही उपलब्ध आहे. लवकरच या कंपनीच्या ई बाईक्सही शोरुममध्ये दाखल होत असल्याचे दुगड यांनी सांगितले. ई दुचाकीच्या अधिक माहिती व टेस्ट ड्राईव्हसाठी संपर्क 8483005969/ 9604008690.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा