आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन- काय खाणे टाळावे? (पांढरी विषे)

मीठ

शंदेलोण (सैंधव), पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दरयाई मीठ असे आयुर्वेदामध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये सैंधव (मिठा)चा वापर करतात. स्वयंपाकघरात तर कोणत्याच अन्नपदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही, त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये याचे महत्त्वाचे स्थान आहे. परंतु याच्या अतिवापरा मुळे विविध आजारांची लागण होऊन जीवन बेचव होऊ शकते, म्हणून सावध रीतीने मिठाचा आहारात वापर करावा. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. मराठीमध्ये ’मीठ’, हिंदीमध्ये ’नमक’, संस्कृतमध्ये ’लवण’ आणि इंग्रजीमध्ये ’सॉल्ट’ या नावाने मीठ ओळखले जाते. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण (मीठ) असे म्हणतात. आपल्या स्वयंपाकघरातील दैनंदिन वापराचे मीठ हे सामान्यतः समुद्रातून मिळविलेले असते.

गुणधर्म – मीठ हे अग्निप्रदीप्त करणारे धातुवर्धक, कृमिनाशक, रुचिकारक बल्य असते. परंतु त्याचा वापर योग्य प्रमाणातच करावा. ते अजीर्ण, उदरशूळ (पोटदुखी) व गॅसेस या विकारांवर उपयुक्त असते. स्वच्छ, चमकदार, चौकोनी तुकड्यांच्या आकारातील खडे मीठ हे आरोग्यास लाभदायक असते. सूक्ष्म, दाणेदार, आयोडिनयुक्त महागड्या मिठापेक्षा खडे मीठ वापरणे कधीही फायद्याचे असते. कारण शुभ्र व दाणेदार मीठ बनविताना अनेक रसायनांचा वापर करतात. त्यामुळे ते शरीरास घातक होऊ शकते. आयोडाईज्ड मिठाची जाहिरात सर्वसामान्यांची दिशाभूल करणारी असते. प्रत्येक समुद्री मिठामध्ये आयोडिन हे असतेच. शरीराला आयोडिनची जेवढी गरज आहे, तेवढी गरज खडे मिठातूनही भागते. वेगळे असे आयोडाईज्ड मीठ वापरण्याची गरज नाही. दिवसातून चार ग्रॅम्स एवढी मिठाची गरज शरीराला असते. त्यापेक्षा जास्त नको. भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर इत्यादी पदार्थांमधून ही गरज भागते. तरीही लोक या पदार्थांसोबत चटणी, पापड, लोणचे, हवाबंद डब्यातील सूप, ब्रेड, सॉस, केचअप यांचे अधिक प्रमाणात सेवन करतात.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा