साहित्य सहवास – ‘विश्‍वास’

हम में है विश्वास, पुरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन…. हे गाणं ऐकलं की विश्वासाचं महत्व लक्षात येतं. मला स्वत:ला विश्वास होता की वार्षिक परिक्षेत मला ऐशी टक्यांपेक्षा जास्त गुण मिळतील असं जेव्हा एखादा विद्यार्थी सांगतो. त्याला खरंच ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतात तेव्हा आपल्या लक्षात येत ते विश्वासाचं महत्व, आपलाच आपल्यावरचा विश्वास निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे स्वतःची सकारात्मक मानसिकता, सकारात्मक विचार, परिश्रम घेण्याची तयारी, मोठं होण्याची जिद्द, शुल्लक कृतीकडे दुर्लक्ष करणं, पुस्तकं आणि माणसांचं प्रचंड वाचन, कुटुंबाकडून मिळणार प्रोत्साहन, सचोटी, चिकाटी प्राप्तीच्या दिशेनं पडणारं पाऊत, अपयश पचवण्याची ताकद, स्वतःमधील चांगुलपणा. एका रात्रीत यश कधीच मिळत नसतं त्यासाठी शेकडो रात्री, दिवस अथक परिश्रम घ्यावेच लागतात. स्वतःचा, स्वतःवर विश्वास असणं ही आत्यंत महत्वाची प्रेरणात्मक बाब आहे. बर्‍याचदा आपल्या मित्रावर आपला विश्वास असतो. तो मित्र विश्वासघात करतो तेव्हा स्वत:वरचा विश्वासही डळमळीत होऊ लागतो. एखाद्याच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी शेकडो दिवस जातात पण विश्वासघात करण्यासाठी एखादा सेकंदही पुरेसा असतो. आपल्या हातावर, पायांवर विश्वास असणारी माणसं दुर्गभ्रमंती, ट्रेकिंग करतात. मनावर विश्वास असणारी माणसं धाडसाने पाऊल उचलतात, स्वकर्तृत्वावर विश्वास असणारी माणसं महान कार्य करतात. मुलांमध्ये विश्वासरुपी बीज पेरण्याचे कार्य प्रत्येक आई-वडिल करतंच असतात. आई-वडिलांना विश्वास असतो माझा पाल्य नेहमीच चांगलं वागणार, परिचिताने विश्वासघात केला की आपल्याला वाईट वाटतं तसं पाल्ल्याने विश्वासघात केल्यावर आई-वडिलांना कसं वाटत असेल याचा विचार पाल्ल्यांनी जरूर करावा. मला स्वतःला ठाम विश्वास आहे की मी जो विचार, कृती करणार ती माझ्यासह माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी हितकारक असणार आहे असं आपण, स्वत:ला तयार केलं पाहिजे, विश्वास ही एका रात्रीत मिळणारी, तयार होणारी गोष्ट नाहीय. पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास असणं ही संसारमुखाची गुरुकिल्ली आहे. विश्वासघात करुन काय मिळतं? स्वतःलाच एकदा विचारा. ‘मला विश्वास आहे तू जे काही करशील ते योग्यच असेल’ असं ऐकलं की छान वाटतं.

वाईट घटना घडतात, आपला एकमेकांवरचा विश्वास उडतो. वाईट घटना घडणार नाही याची काळजी घेणं कुणाच्या हातात आहे? स्वतः चा, स्वत:वर विश्वास असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे. समोरच्यावर विश्वास ठेवणं. खरं तर अविश्वासाने काहीही साध्य होणार नाही. समोरच्यावर विश्वास ठेऊन आपण एखादं काम करून घेऊ शकतो. एखादा कलाकार म्हणतो दिग्दर्शकाने माझ्यावर पूर्णतः विश्वास ठेवला म्हणूनच मी हे यश मिळवू शकलो. समोरच्याने आपल्यावर विश्वास ठेवणं यासारखी आनंददायी बाब नाही. त्याने आपल्यावर ठेवलेला विश्वासंच आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतो, अशक्य ते शक्य करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. असं म्हणतात हे संपूर्ण विश्व एकमेकांच्या विश्वासावरचं चाललं आहे. समोरच्यावर आपण ठेवलेला विश्वास हे त्याच्यासाठी शक्तिशाली, आपलेपणा वाचवणारं, त्याच्यातील क्षमता ओळखणारं, एकंदरित समोरच्यासाठी नवीन काही करण्याची उर्मी निर्माण करणार आहे हे निश्चित. आपल्यावर एखाद्याने विश्वास ठेवला तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही असं बोलणं, व्यवहार करणं, प्रेमानं समजून घेणही महत्वाचं आहेच. ‘माझा विश्वास आहे तू हे नकीच का शकशीत’, असं एखाद्याने आपल्याला म्हंटलं तर आपलं तन, मन आनंदी होतं. विश्वास हा एवढा चांगला असतो की परस्परांनाही आपलंसं करतो, त्यांच्यात जिगर निर्माण करतो, त्यांना जगण्याचं बळ देतो. विश्वासाने नातं जोडता येतं. नात्यांची वीण अधिक घट्ट होऊ शकते. स्वत:वरचा विश्वास तर चांगला अर्थात आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो. आपला, स्वत: च्या सामर्थ्यावर विश्वास असणं आणि समोरच्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं खूपच महत्वाचे आहे.

(लेख क्र.364) सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार, अ.नगर., मो. 9822758383

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा