आदर

सम्राट चद्रगुप्त मौर्य याचा मुलगा बिंदूसार हा शेजारच्या राजाच्या निमंत्रणावरून त्या राज्याच्या भेटीसाठी गेला होता. तेथे गेल्यावर अनेक सरदार, मानकरी यांच्याशी त्याची लोळख झाली. त्यातील एका सरदाराने, ’’आर्य चाणक्य यांना भेटायची फार इच्छा आहे’’, असा मनोदय बिस्ताराजवळ व्यक्त केला, बिंदुसाराने आनंदाने त्याला आपल्या राज्यात यायचे आमंत्रण दिले. काही महिन्यानंतर तो सरदार चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात त्यांच्या भेटीसाठी आला. चाणक्याची कीर्ती तो जाणून होता. त्यामुळे त्याच्या मनात चाणक्याबद्दल असूया होती…

दरबार, त्याचे वैभव पाहून त्याला नाही. काहीतरी निमित्त काढून त्याने बोलताना चंद्रगुग्नाचा अपमान केला. पण शेजारच्या राजाचा पाहूणा म्हणून चंद्रगुप्ताने त्याकडे दुर्लक्ष केले. हे लक्षात येताच थोड्या वेळाने त्या सरदाराने चाणक्याचा अपमान होईल अशी वाक्य उच्चारली. त्या क्षणी मात्र चंद्रगुप्त उठला आणि त्याने खाड्कन त्या सरदाराच्या तोंडात मारली. चंद्रगुप्ताने आपला अपमान गिळला पण आपल्या गुरुचा झालेला अपमान त्याने सहन केला नाही. पाहूणा खर तर बिंदूसाराच्या निमंत्रणावरून आला होता. तेव्हा त्यानेही पित्याचा अपमान प्रथम सहन केला पण पित्याच्या गुरुचा अपमान त्यालाही सहन झाला नाही. त्याने त्या सरदाराला दरबाराबाहेर काढले. कारण दोघाही पिता-पुत्रांना गुरु बद्दल आत्यंतिक आदर असून ते संस्कार जपणारे होते.

तात्पर्य – कितीही मोठेपण मिळाले तरी सस्कार जपणं आवश्यक आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा