दूर करा पोटाच्या समस्या

पचनसंस्थेचं कार्य सुरळीत राहिलं तर आपलं आरोग्य उत्तम रहातं. पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यात काही नैसर्गिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. मेथीदाण्यांमध्ये पचनशक्ती सुधारण्याची क्षमता असते. पोटाला आराम देण्यासाठी थोडे मेथीदाणे तोंडात टाकून नीट चावून खा. यामुळे पचनासंबंधीच्या तक्रारी दूर होतील. सारखं पोट बिघडण्याची समस्या असणार्‍यांनी आल्याचं नियमित सेवन करायला हवं. आल्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. आल्याचा तुकडा चघळला तरी बराच आराम मिळू शकतो. कोरफडीच्या गरामुळेही पोटाच्या तक्रारी दूर होतात. कोरफडीमुळे शरीरातली विषद्रव्यं निघून जातात आणि पचनशक्ती बळकट होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा