प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

अहमदनगर- प्रदूषण नियंत्रण मंडळाने शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेत अरणगाव व खंडाळा (ता. नगर) हद्दीतील तीन खडी क्रेशर कायमचे बंद करुन तीन खडी क्रेशरच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये असलेल्या त्रुटी पुर्ण होईपर्यंत खडी क्रेशर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थगितीचे आदेश देऊनही तीन खडी क्रेशर अनेक दिवसापासून सर्रास सुरु असल्याने सदरील खडी क्रेशर बंद करण्याच्या मागणीसाठी खडी क्रेशर विरोधी शेतकरी कृती समिती, भाकप, किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्या वतीने सावेडी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश देऊनही खडी क्रेशर बंद होत नसल्याने शेतकर्यांपनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात नारायण पवार, ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, सतीश पवार, संदीप साखरे, भानुदास गव्हाणे, अंकुश गव्हाणे, भाऊ साठे, संदीप खंडागळे, नवनाथ शिंदे, प्रमोद पवार पोपट काळे, नवनाथ काळे आदी सहभागी झाले होते. खडी क्रेशरच्या धुळीने शेतीचे नुकसान होत असल्याने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला अरणगाव हद्दीतील शेतकर्याांनी खडी क्रेशर बंद करण्यासाठी व नवीन खडी क्रेशरचे परवाने देणे थांबविण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. तीन दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागीय प्रादेशिक अधिकारी डॉ. पी. एम. जोशी यांनी आदेश देऊन श्रीराम स्टोन क्रेशर, म्हस्के-साळुंके कॉन्ट्रॅक्टर, माहेश्वतरी हे तीन स्टोन क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

तर ऑनलाईन नोंदणीनंतर त्रुटी असणार्याश भारत स्टोन क्रेशर, श्री आदिशक्ती, भैरवनाथ स्टोन क्रेशर या तीन खडी क्रेशर चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून अटीची पुर्तता करे पर्यंत खडी क्रेशरच्या कामाला स्थगितीचे आदेश दिले होते. मात्र यापैकी कायम बंद करण्याचे आदेश असलेले म्हस्के-साळुंके कॉन्ट्रॅक्टरचे खडी क्रेशर तसेच तात्पुरती स्थगिती दिलेले भारत स्टोन क्रेशर, श्री आदिशक्ती या तिन्ही खडी क्रेशर चालकांनी आदेशाची पायमल्ली करुन खडी क्रेशर सुरुच ठेवले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज महावितरणला या तिन्ही खडी क्रेशरचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही वीज महावितरणकडून या खडी क्रेशरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला नसल्याने, खडी क्रेशर सुरु आहे. यामुळे शेतकर्यांरना त्रास होऊन पिकांचे नुकसान होत आहे. खडी क्रेशर चालकांना काम बंद करण्याचे सांगितले असता, शेतकर्‍यांना दमदाटी केली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने खडी क्रेशर बंद करण्याचे आदेश देऊनही खडी क्रेशर सुरु ठेवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी खडी क्रेशर विरोधी शेतकरी कृती समिती, भाकप, किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदासनी यांना देण्यात आले. रेहदासनी यांनी खडी क्रेशर बंद ठेवण्याचे आदेश देऊन खडी क्रेशर सुरु ठेवणार्यांचवर कारवाई करण्याचे आश्वाीसन दिले. सदरील खडी क्रेशर बंद होऊन त्यांच्यावर कारवाई न झाल्यास नगर-दौंड महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा शेतकर्याांनी दिला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा