आय.एम.एस.च्या वार्षिक शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन

अहमदनगर- आय. एम. एस. संस्थेच्या वतीने दरवर्षी शोध निबंध पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येते. यावर्षी देखील संस्थेने Indian Journals of Current Trends in Management Science या पुस्तिकेचे प्रकाशन संस्थेचे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. मिरा कुलकर्णी, संगणक विभागप्रमुख डॉ. उदय नगरकर, पुस्तिकेच्या संपादिका डॉ. प्रोनोती तेलोरे, डॉ. राहुल खंडेलवाल उपस्थित होते. डॉ. मेहता म्हणाले कि अशा प्रकारच्या पुस्तिकेच्या माध्यमातून शिक्षकांना विविध विषयातील शोधांसाठी याचा अतिशय उपयोग होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करताना याचा वापर करता येईल. जे प्राध्यापक नव्याने पी.एच डी करत आहे ते देखील या शोधनिबंधाचा उपयोग करून घेऊ शकतात.

डॉ. तेलोरे यांनी या पुस्तिकेची माहिती देताना सांगितले की यात देश विदेशातील मिळून एकूण 30 शोधनिबंध उपलब्ध आहेत. देशातील विविध राज्यामधून जसे कि महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओरिसा, झारखंड, दिल्ली, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक त्याच प्रमाणे विदेशातील मलेशिया येथून शोधनिबंधांचा समावेश आहे. हे शोध निबंध समावेश करताना ISSN च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आल. त्याचप्रमाणे हि पुस्तिका UGC Care लिस्टमध्ये नोंदणी केली जाणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त प्राध्यापक व विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राहुल खंडेलवाल यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा