अजेय किल्ला

भारतात अनेक गड-किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्येही अनेक किल्ले पहायला मिळतात. इथल्या भरतपूरमध्ये लोहगड किंवा लोहागड नावाचा किल्ला आहे. नावाप्रमाणेच हा किल्ला मजबूत आहे. हा देशातला एकमेव अजेय दुर्ग असल्याचं म्हटलं जातं. हा किल्ला कोणीही जिंकू शकलं नाही. इंग्रजांनाही या किल्ल्यापुढे गुडघे टेकावे लागले.

1733 मध्ये या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन प्रशासक महाराजा सूरजमलने हा किल्ला बांधला होता. त्या काळात तोफांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा. त्यामुळे तोफगोळ्यांपासून या किल्ल्याचं रक्षण करण्याच्या उद्देशाने या किल्ल्याची रचना करण्यात आली. त्यामुळे किल्ल्याच्या भिंतींवर तोफगोळ्यांचा काहीच परिणाम होत नाही. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने रचना करण्यात आल्याने शत्रू या किल्ल्यात शिरू शकत नाही. या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी इंग्रजांनी 13 वेळा प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी त्यांच्या हाती अपयश आलं. या किल्ल्यावर तोफगोळ्यांचा मारा केला तरी किल्ल्याची अभेद्य भिंत त्यांना भेदता आली नाही. असा हा किल्ला भारताची शान आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा