गुपित गूढ गुहेच

आजवर तुम्ही विविध गूढ गुहांबद्दल ऐकलं असेल. पण व्हिएतनाममधली एक गुहा अनेक अर्थांनी अनोखी आहे. ही जगातली सर्वात मोठी गुहा असल्याचं म्हटलं जातं. या गुहेत वेगळंच जग वसलं आहे. गुहेतून चित्रविचित्र, भीतीदायक आवाज येत असतात. हे आवाज ऐकून कोणाचाही थरकाप उडाल्याशिवाय रहाणार नाही. ‘हँग सोंग डूंग’ नावाची ही गुहा नऊ किलोमीटर लांब, 200 मीटर रुंद आणि 150 मीटर उंच आहे. या गुहेत झाडं, झुडपं, घनदाट जंगलं, नदी असं बरंच काही आहे. लाखो वर्षांपूर्वीची ही गुहा 2013 मध्ये पर्यटकांसाठी खुली झाली. ही गुहा खूपच धोकादायक असल्यामुळे दर वर्षी फक्त 250 ते 300 लोकांनाच इथे जाण्याची परवानगी मिळते.

1991 मध्ये हो खानह नामक स्थानिकाने या गुहेचा शोध लावला. पण आतून येणार्‍या भयंकर आवाजांमुळे कोणीही इथे येण्याची हिंमत करू शकलं नाही. 2009 मध्ये ही गुहा जगाच्या नकाशावर आली. 2010 मध्ये शास्त्रज्ञांनी 200 मीटर उंच भिंत ओलांडून या गुहेत प्रवेश करण्याचा रस्ता शोधला. या गुहेत जाण्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. मात्र इथला अनुभव भन्नाट असतो. या गुहेत प्रवेश करण्याआधी तब्बल सहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर जाण्याची परवानगी मिळते. या प्रशिक्षणादरम्यान रॉक क्लाइंबिंग तसंच खडतर रस्त्यावरून चालावं लागतं.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा