गार्लिक पोटॅटो

साहित्य –    4 बटाटे, 2 मध्यम आकाराचे कांदे, 7-8 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, कोथिंबीर बारीक चिरून, साखर व मीठ आवडीप्रमाणे, 4-5 सुक्या लाल मिरच्या.

कृती –        बटाटे व कांद्याची साले काढून पातळ लांबट फोडी कराव्यात. लाल मिरच्या, मीठ व लसूण एकत्र वाटून घ्यावे. कढईत पाव वाटी तेल गरम करून फोडणी करावी. फोडणीत वाटण व कांदा परतून घ्यावा. त्यात पाव चमचा हळद घालावी व बटाट्याच्या फोडी घालाव्यात. झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजू द्यावी. लाल मिरचीमुळे भाजीला सुंदर लाल रंग व स्वादही येतो. भाजी शिजल्यानंतर 2 टीस्पून लिंबाचा रस व कोथिंबीर घालावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा