आर्थिक साक्षरतेसाठी जाणा- वॉरन बफे

वॉरन बफे म्हणजे जगप्रसिद्ध गुंतवणूकदार! शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व दानशूर व्यक्ती! ज्याला कुणाला अर्थसाक्षर बनून योग्य गुंतवणुकीने श्रीमंत होऊन सामाजिक दायित्त्व पूर्ण करावयाचे असेल त्यांनी वॉरन बफे वाचला पाहिजे. समजून घेतला पाहिजे. खेळण्याच्या वयात कोकच्या 6 बाटल्यांचा संच विकून 5 सेंटस्चा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्‍या वॉरेन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली.

त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय नितीमत्तेने, कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसाय जगात सहसा दुर्मिळ असणार्‍या नैतिकतेच्या मार्गाने त्यांनी आर्थिक यशाचे शिखर सर केले. त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी 90% संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला त्यांनी परत (दान) केली. आपल्याही देशात रतन टाटा, अझीज प्रेमजी, महिंद्रा यासारख्या उद्योजकांनी हा पायंडा जपला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा