जिल्ह्यातील 9 गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यातील गावठी दारू अड्ड्यांवर वीस दिवसातील चौथी मोठी कारवाई करत 9 गावठी दारूअड्ड्े उध्वस्त करुन 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत शेवगाव, श्रीरामपूर, भिंगार कॅम्प, राहुरी, कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 9 गावठी दारू भट्ट्यांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये गावठी हातभट्टीत तयार दारू, देशी दारू, कच्चे रसायन, भट्टीची साधने, नवसागर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 12 आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा