ब्राह्मण वधु-वर संचालक ग्रुपतर्फे उच्चशिक्षित वधुवर मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर – ब्राह्मण वधु-वर संचालक ग्रुपच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या वधू-वर मेळाव्यात अनेक वधुवरांची लग्ने झाली आहेत. आता यावर्षी पुन्हा ऑनलाईन मेळावा होत आहे, अशी माहिती संयोजक व येथील वैष्णवी वधू-वर सूचक मंडळाच्या संचालिका श्रीमती अलकाताई कुलकर्णी यांनी दिली.

या ऑनलाईन मेळाव्यासाठी नोंदणी करावी आणि हक्काचे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून घ्यावे. याचा लाभ घ्यावा. नोंदणीसाठी संपर्क किंवा मेसेज पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. गुगल मीट मेळावा शुल्क 100 रुपये असून हे भरण्यासाठीसहभागी गुगल पे करू शकतात. नोंदणीनंतर सविस्तर सूचना व मेळाव्यासंबंधी समुपदेशन आणि बरेच काही वधूवरांच्या हितांसाठी सूचना देण्यात येतील. आजच नोंदणी करून, घरी बसून जोडीदार मिळवावा, असे आवाहन श्रीमती अलकाताई कुलकर्णी यांनी केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9420950803 या क्रमांकावर संपर्क साधावा. गुगल पे व व्हाटसऍपसाठी हाच क्रमांक आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा