आडते बाजारातून व्यापार्‍याची 96 हजाराची रोकड पळवली

अहमदनगर- शहरातील आडते बाजार परिसरात दुकानाबाहेर लावलेल्या मोपेड गाडीच्या डिक्कीतून व्यापार्‍याची 96 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने भरदिवसा चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि.2) दुपारी 4 ते 4.30 या कालावधीत घडली.

याबाबत अशोक मदूमल मेहतानी (वय 39, रा.राधानगरी, नागरदेवळे) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेहतानी यांचे किराणा दुकान असून ते बाजारपेठेत आडते बाजारातील आर.एम.ट्रेडर्स नावाच्या दुकानात माल खरेदीसाठी आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुकानासमोर लावलेल्या मोपेड गाडीच्या डिक्कीत 96 हजार रुपयांची रोकड ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत डिक्कीचे लॉक तोडून डिक्कीतील 96 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा