पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन – राज्यभरातील कोट्यवधी जनावरांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर – पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने विविध मागण्यांसाठी 15 जूनपासून वेगवेगळ्या टप्प्यात असहकार आंदोलन सुरू केलेले होते. म ात्र, या आंदोलनाकडे पशुसंवर्धन आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्यावतीने रविवार दि.1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे नगरसह राज्यातील पशु वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आंदोलनाबाबत बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब सोनावळे यांनी सांगितले की, पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियम ात सुधारणा करणे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट अ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती करू नये, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचार्यांना देण्यात आलेल्या तिसर्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचार्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा, पदवीका प्रमाणपत्र धारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना 27 ऑगस्ट 2009 रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी यासह अन्य मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या डॉक्टरांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आता पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात राज्यातील 2 हजार 853 पशु आरोग्य संस्थांमधील 4 हजार 500 पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी झाले असून खासगी पशु वैद्यकीय सेवा पुरविणार्या जनावरांच्या डॉक्टरांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

जनावरांच्या डॉक्टरांच्या काम बंदमुळे एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 14 लाख 50 हजार पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनाला खासगी जनावरांचे डॉक्टरांचा पाठींबा असल्याने आंदोलनातून लवकरात मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. पशूसंवर्धन विभागाने संघटनेच्या मागणीचा विचार करून आंदोलन करण्याची वेळ येऊ द्यायला नको होती, अशी भावना संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनावळे, सरचिटणीस डॉ.नितिन निर्मळ,कार्याध्यक्ष डॉ.संजय कढणे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सुधाकर लांडे, कोषाध्यक्ष डॉ. गंगाधर निमसे यांनी व्यक्त केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा