तलाठी असल्याचे सांगून महिलेला लुटणार्‍या सराईत गुन्हेगारास 24 तासात केले जेरबंद

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)

अहमदनगर- ‘आपण वाळुंज गावचा तलाठी आहे, तुमचे बँकेचे पिक विम्याचे 7 हजार रुपये आले आहेत’, असे सांगून महिलेला रिक्षात बसवून पुणे स्टॅण्डच्या पाठीमागे नेवून 2 हजाराची रोकड व 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लुटणार्‍या सराईत गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे.

सदरील सराईत गुन्हेगार ज्ञानदेव हरिभाऊ चेडे (वय 37, रा.पुणेवाडी, ता.पारनेर हल्ली रा.हनुमाननगर, शुभलक्ष्मी हॉटेल जवळ अरणगाव रोड) याच्यावर यापुर्वी विविध पोलिस ठाण्यात तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत. त्याने सोमवारी (दि.2) दुपारी 12 च्या सुमारस माळीवाडा बसस्थानक परिसरात एस.टी. बसची वाट पाहत उभ्या असलेल्या शांताबाई सोपान मोरे (वय 65, रा.वाळुंज, ता.नगर) यांना ‘मी वाळुंज गावचा तलाठी आहे’, असे सांगून ‘तुमचे बँकेत पिक विम्याचे 7 हजार रुपये आले आहेत ते तुम्हाला काढून देतो’, असे सांगून त्यांना रिक्षामध्ये बसवून बळजबरीने पुणे स्टॅण्डच्या पाठीमागे घेऊन जावून लुटले होते. याबाबतची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना सदरचा गुन्हा करणारा आरोपी अरणगाव परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मनोज कचरे यांना त्यांनी सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पाठविले. उपनिरीक्षक कचरे यांच्या नेतृत्वाखाली पो.ना.योगेश भिंगारदिवे, नितीन शिंदे, सागर पालवे, नितीन गाडगे, बंडू भागवत, भारत इंगळे, सुजय हिवाळे, तानाजी पवार, सुमीत गवळी, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशिल वाघेला यांच्या पथकाने अरणगाव येथे सापळा लावून सराईत गुन्हेगार ज्ञानदेव चेडे यास पकडले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा