नगर-पाथर्डी रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी पकडली

(छाया-बबलू शेख,अहमदनगर)  

अहमदनगर- नगर – पाथर्डी महामार्गावर भिंगार कडून बाराबाभळी गावचे दिशेने दुचाकीवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार्‍या टोळीला पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना सिनेस्टाईलने पकडण्यात आले असून दोघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. केशव उर्फ काज्या ताज्या भोसले (वय 20 रा. डेअरी फार्म, चर्चमागे यशवंतनगर, भिंगार), मयुर उर्फ हरीष युवराज काळे (वय 25 रा. लक्ष्मी मंदीरजवळ, यशवंतनगर, भिंगार), वैभव नखर्‍या चव्हाण (वय 25 रा. लक्ष्मीमंदीरजवळ, यशवंत नगर, भिंगार) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

भिंगार कॅम्प पोलीसांचे पथक खाजगी व सरकारी वाहनाने फरार आरोपींचा शोध घेत असताना स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांना काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी प्रकाश हॉटेल समोर नगर -पाथडी रोड येथे शेतात सापळा लावून दबा धरून बसले. त्यानंतर काही वेळातच तीन मोटर सायकलवरून 5 इसम डबलसिट बसून विजयनगर चौक कडून बाराबाभळीकडे येताना दिसले. त्यावेळी पथकातील सर्वांनी एकाच वेळी रस्त्यावर येऊन त्यांना मोटार सायकली थांबविण्याचे इशारे केले. पुढे असलेल्या दोन मोटर सायकली थांबवून सदर मोटर सायकलीवरील 3 इसमांना ताब्यात घेतले. या सर्वांना ताब्यात घेत असताना त्यांचे पाठीमागून येत असणार्‍या आणखी एक मोटरसायकल वरील दोन इसमांनी पोलीसांना हुलकावनी देऊन ते दोघे पाथर्डी रोडचे दिशेने भरधाव वेगात निघून गेले. त्यानंतर पकडलेल्या इसमांकडे पळून गेलेल्या इसमांबाबत चौकशी केली असता केशव ताज्या भोसले याने पळून गेलेल्या इसमांची नावे ताज्या पाच्या भोसले (रा सैनिक नगर, भिंगार), रुपेश ताज्या भोसले (रा. सैनिक नगर, भिगार) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पकडलेल्या इसमांची अंगडझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये एक सत्तू दोन लाकडी दांडके, दोरी, मिरची पावडर, व दोन मोटर सायकल असा दरोड्याच्या तयारीतील मुद्देमाल एकूण 60 हजार 30 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पो.ना. राहुल द्वारके यांच्या फिर्यादीवरून या तिघांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 399,402, आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी, उपनिरीक्षक सचिन रनशेवरे, पो.हे.कॉ. जी. डी. गोल्हार, पो.ना. जी. वाय. जठार, पो.ना. राहुल द्वारके, पो.ना. भानुदास खेडकर, पो.कॉ. गणेश साठे, अविनाश कराळे, समीर शेख, महादेव निमसे, भागचंद लगड,संजय काळे, संदिप शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा