नागेबाबा सुरक्षा कवच सर्वसामान्यांसाठी आधार ठरेल – ह.भ.प. भास्करगिरी महाराज

अहमदनगर- कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक संकटात सापडला आहे. या संकट काळात नागरिकांसाठी दिलासादायक कामे करणे अत्यावश्यक झाले आहे. याचेच महत्व ओळखून संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेने सर्वसामान्यांसाठी गेल्या वर्षभरा पासून राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. आता सर्वसामान्यांसाठी नागेबाबा सुरक्षा कवच योजना सुरु करून या संस्थेने सर्वसामान्यांना मोठा आधार दिला आहे. या संस्थेचा कणा असलेले कडूभाऊ काळे हे भक्कम व दुरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व असल्यानेच येथे चांगले काम उभे राहिले आहे, असे प्रतिपादन देवगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांनी केले. श्री. संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्थेने नव्याने सुरु केलेल्या नागेबाबा सुरक्षा कवच योजनेचा शुभारंभ देवगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संस्थेच्या सावेडी येथील मुख्य कार्यालयात झाला. यावेळी सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष काकडे, सिए असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरण भंडारी, ऍड.राऊत, तज्ञ संचालक सिए अमित फिरोदिया, संजय मनवेलीकर आदींसह अधिकारी, खातेदार व सभासद उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय म नवेलीकर म्हणाले, संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने आपत्ती काळात मोठे मदत कार्य केले आहे. आता नागेबाबा सुरक्षा कवच योजना सुरु केली आहे. या योजनेत 5 लाख नागरिकांना केवळ 300 रुपयांत नागरिकांना 10 लाख रुपयांचा अपघाती जोखीम व 5 लाख रुपयांचे हॉस्पिटल मधील उपचार विमा नागरिकांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त नागेबाबा संस्थेच्या वतीने सर्वसामान्यांसाठी अन्नपूर्णा योजना, 50% सवलतीत सर्व महागड्या रक्त तपासण्या आदीसह विविध योजना राबवल्या जात आहेत. ऍड. सुभाष काकडे यांनीही संस्थेस शुभेच्छा दिल्या. सिए अमित फिरोदिया यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा