मैत्री दिनाच्या निमित्ताने श्रीराम मंदिर देवस्थान परिसरात वृक्षारोपण

अहमदनगर – भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. 1958 पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.

सह्याद्री वनराई प्रमाणे दहिगाव साकत या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने मैत्री दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि बाल मित्र एकत्र येत श्री राम मंदिर देवस्थान च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आणि मैत्री दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी सोमेश भोगाडे, उपसंरपच महेश म्हस्के, शिवा म्हस्के ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब हंबडेॅ, संजय पोटरे, शिवाजी सांळुके, जयसिंग हंबडेॅ,शरद हिंगे, प्रविण अरुणे, संतोष कार्ले, मोसिम शेख, आदी मित्र उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा