भाजपच्या सत्तेच्या काळात मनपात विविध विकासकामे लागली मार्गी – बाबासाहेब वाकळे

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)

माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांच्या प्रयत्नातून बागडपट्टी ते सर्जेपुरा रस्ता डांबरीकरणचा शुभारंभ

अहमदनगर- गेल्या अडीच वर्षामध्ये अहमदनगर महानगरपालिका मध्ये भाजपची सत्ता असताना शहराचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे विकास कामात पक्षीय राजकारण न आणता विकास कामांना प्राधान्यक्रम दिला, उपमहापौर मालनताई ढोणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रभागत विविध विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करून घेतला आहे,सर्जे पुरा ते सिद्धीबाग हा रस्ता शहरातील महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम आता लवकरच पूर्ण होऊन नगरकरांना वाहतुकीसाठी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे, भाजपाची अहमदनगर महापालिकेत सत्ता असताना विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून विकासाला चालना दिली आज ते कामे आता पूर्णात्वाकडे येत आहे, असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. मालनताई ढोणे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.9 मधील सर्जेपुरातील सिताराम सारडा शाळा ते बागडपट्टी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी नगरसेवक यशवंत ढोणे, सभागृह नेते रवींद्र बारस्कार, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक मनोज दुल्लम, विलास ताठे, सतिष शिंदे, राहुल कांबळे, अजय चितळे, चेतन जग्गी, ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र विधे, गणेश नन्नवरे, उदय कराळे, सुरेश शेळके, प्रवीण ढोणे, विलास लांडगे, भाऊसाहेब नागापूरे, राजेंद्र बागडे, किरण जेव्हेरी, पिंटू गोधडे, सुधाकर मिसळ, काका सोमाणी, मनोहर किंगर, फारूक नालबंद, इम्रान शेख, सिकंदर सय्यद, राजू फिटर, रमजान खान, मुसा शेख, मिरजा शेख, अन्वर नालबंद, शिवाजी शिंदे, अक्षय भागवत, भास्कर मोकटे, अजय ढोणे, संजय ढोणे, बंटी चव्हाण, विशाल जाधव, जाफर शेख, प्रफुल्ल दांगट, विजय जरे, विशाल भागवत, भाऊ फुला, देवा भगत, हेमंत दाळवाले, बब्बू दांगट, अभिजित ढोणे, सागर नागपूरे, सौरभ वाघ, सचिन अलचेट्टी, विशाल भंडारी, अमोल ढोणे, शशांक ढोणे, सुधाकर मोकटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मालनताई ढोणे म्हणाल्या की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. गेल्या अडीच वर्षात मध्ये शहराच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहे. याच बरोबर प्रभागातील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून शहराच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे,याचबरोबर भुयारी गटार योजनेचे कामही मार्गी लागणार आहे. सर्जेपुरा, बागडपट्टी रस्त्याच्या जमिनीअंतर्गत सर्व कामे मार्गी लावले आता डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे असे त्या म्हणाल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा