दिव्यांगानी बसस्थानकात जाऊन, प्रवास सवलतीच्या स्मार्टकरीता नोंदणी करावी

अहमदनगर- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने, राज्यातील सर्व दिव्यांगांना (अंध अस्थि व्यंग) व्यक्तिंना, शासन निर्णय क्र. एसटीसी 1017/प्र.क्र.525/ परि.1 दि.09/10/2018 नुसार आधार संलग्न स्मार्ट कार्ड देण्याचा आदेश दिलेला होता. मागील दोन वर्षात अगोदर ज्येष्ठ नागरीक आणि पुरस्कारार्थी यांना प्राधान्याने स्मार्ट कार्ड देण्यात आली . दिव्यांगांना आतापर्यंत युडी आयडी कार्ड किंवा जिल्हासमाज कल्याण अधिकारी यांचे ओळखपत्रावर ही सवलत मिळत होती. परंतु आता मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबईचे, महाव्यवस्थापक यांनी, परिपत्रक क्र 2/2021 क्र. राप/ वाह/सवलत/स्मार्ट कार्ड/994 दि.06 मार्च 2021 नुसार राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना, दिव्यांग (अंधअपंग) व्यक्तीकडून, पन्नास रुपये नोंदणी शुल्क घेऊन, स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आपल्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनी यांनी खालील कागदपत्र घेऊन आपल्या तालुक्यातील डढ डेपोत आगारात जावुन स्मार्ट कार्डसाठीची नोंदणी करून घ्यावी.

1) केन्द्र शासनाचे यु. डी. आय डी. कार्ड. 2) आधार कार्ड. 3) दिव्यांगाचे जिल्हा शल्य चिकीत्सकाचे प्रमाणपत्र, 4) पासपोर्ट फोटो. 5) मतदान कार्ड. 6) ओटीपी नंबर करीता स्वतःजवळ नेहमी असणारा, स्वतःचा मोबाईल घेऊन जवळच्या, आगारप्रमुखा मार्फत स्मार्ट कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केले असून, स्मार्ट कार्ड नोंदणी नंतर, एका महिन्यातच, तुमच्या तालुक्याच्या डेपोमध्ये आगार प्रमुखा मार्फत, बस प्रवास सवलतीचे स्मार्कार्ड, दिव्यांगाना देण्यात येणार आहे व कदाचित त्यानंतर बसचे स्मार्ट कार्ड शिवाय अन्य दुसर्‍या कोण त्याच कार्डमध्ये दिव्यांगाना सवलत मिळणार नाही. तरी सर्वच दिव्यांग बंधू भगीनींनी, आपल्या स्मार्ट कार्डची लवकर नोंदणी करून घेण्याचे आवाहन सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा