डॉ.अमरसिंह निकम यांना होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक ही उपाधी प्रदान

अहमदनगर- होमिओपॅथीच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे तथा होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून होमिओपॅथीला संपुर्ण महाराष्ट्रात विशेष स्थान मिळवून देणारे डॉ. अमरसिंह दत्तात्रय निकम यांना 25 जुलै रोजी अहमदनगर येथे भव्य दिव्य सोहळ्यात गुरुपौर्णिमा तसेच स्वामी होमिओपॅथिक हॉस्पिटल, अहमदनगर यांचे तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त टीम मिशन होमिओपॅथी तर्फे सर्वांचे गुरु डॉ. अमरसिंह दत्तात्रय निकम यांना होमिओपॅथीच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्याबद्दल आणि गेल्या सव्वीस वर्षापासून आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटल व हिलींग सेंटरच्या माध्यमातून अविरत रुग्णसेवा देत असल्या कारणाने होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक या उपाधीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. आशियातील पहिल्या होमिओपॅथिक हॉस्पिटलची स्थापना सन 1995 साली डॉ. अमरसिंह निकम यांनी केली. ग्रॉस पॅथॉलॉजिकल केसेस होमिओपॅथी शास्त्राच्या माध्यमातून पूर्णपणे बर्‍या करण्यात यश मिळविले (हृदय रोग, ब्रेन ट्यूमर, लीवर फेलियर, लकवा, निमोनिया, एक्यूट और क्रॉनिक डिजीज इत्यादी) नवनवीन होमिओपॅथी मधील शोध व प्रॅक्टिसमधील अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करून होमिओपॅथीक पुढील डॉक्टरांची पिढी घडविण्याचे कार्य डॉ. निकम गेली चाळीस वर्ष करत आहेत.

त्यामध्ये विशेष करून लिहिली गेलेली काही पुस्तके (थर्मल, मिशन, वाइटल फोर्स – 30 पोटेंसी ) होमिओपॅथिक हॉस्पिटल कसे चालवावे याचे मार्गदर्शन तसेच महामारी सारख्या गंभीर स्थितीत होमिओपॅथी कशी वापरावी याबद्दल सातत्याने मार्गदर्शन सेमिनार, लेक्चर्स, वर्कशॉप या माध्यमातून केले आहे. देशभरातील तसेच विदेशातीलही होमिओपॅथिक डॉक्टर्स, विद्यार्थी निकम सरांच्या आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटल मध्ये शिकण्यासाठी येतात त्यांना मार्गदर्शन करणे व अतिशय दुर्धर आजार होमिओपॅथिक चिकित्सेच्या माध्यमातून कसे बरे करायचे यांचे अनमोल मार्गदर्शन डॉ. निकम नेहमी करत असतात. होमिओपॅथी या शास्त्राचे जनक हे जर्मनीचे डॉ. सॅम्युअल हॅनिमन हे आहेत, मात्र डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या सर्व होमिओपॅथिक सिद्धांताचे अचूक आणि योग्य पद्धतीने अवलंबन करून, सुरुवातीला 14 वर्षे ओपीडी प्रॅक्टिस केल्यानंतर प्रदीर्घ अनुभव घेऊन डॉ. निकम यांनी पुण्यातील पिंपरीगावात सर्वप्रथम 1995 साली चार बेडचे होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू केले. म्हणजे आता गेल्या 5 ते 6 वर्षांपासून भव्य असे लिफ्टची सोय असणारे 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाले आहे. या भव्य हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद येशो नाईक, डॉ. डी. वाय. पाटील उपस्थित होते.

गेल्या चाळीस वर्षात डॉ. निकम यांनी अनेक रुग्णांना त्यांच्या दुर्धर आजारातून बरे करून त्यांना नवीन आणि दीर्घायुष्य दिले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु आत्तापर्यंत होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक ही उपाधी त्यांना मिळाली नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी टीम मिशन होमिओपॅथीच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधून डॉ. अमरसिंह निकम यांना ही उपाधी प्रधान केली आहे. त्याचबरोबर येथे होमिओपॅथिक विद्यार्थ्यांसाठी डॉ. निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100 विद्यार्थ्यांनी या मोफत व्याख्यानाचा लाभ घेतला. या व्याख्यानात सहभाग घेण्यासाठी अहमदनगरचे डॉ. साईनाथ चिंता, कोपरगावचे डॉ. शितलकुमार सोनवणे, नाशिकचे डॉ. मुकेश मुसळे आणि पुण्याचे डॉ. सौ. राखी होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. संकेत लांडे, डॉ. अनिल नवथर आणि डॉ. रुपेश सोनवणे, डॉ. गणेश वाघचौरे आणि डॉ. गणपत जाधव यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश जंगले आणि डॉ. सुहासिनी चव्हाण यांनी केले तर डॉ. सुनिता चिंता आणि डॉ. रूपाली जंगले यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा