राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत नवीन मराठी शाळा, विश्रामबाग प्रशालेचे सुयश

अहमदनगर – मंथन वेलफेअर फौंडेशनवतीने 2019-20 या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नवीन मराठी शाळा, विश्रामबाग प्रशालेचे 3 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत अनुष्का महेंद्र भणभणे (इ. 3री, राज्यात 11वी), प्रणिल बंडु नागरगोजे (इ. 4थी, राज्यात 17वा) व धनराज सोमनाथ शेळके (इ.4 थी, राज्यात 9वा) यांनी यश मिळविले.

या विद्यार्थ्यांना शिक्षक नितीन देशमुख, संगीता भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, विश्वस्त मंडळाचे सदस्य गौरव फिरोदिया, गौरव मिरीकर, खजिनदार प्रकाश गांधी, विद्यमान मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे, माजी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना भणगे आदींनी अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा