टोमॅटो धिरडे

साहित्य –  तांदूळ पीठ पाऊण कप, तिखटपूड 2 लहान चमचे, आले कीस 1 लहान चमचा, साखर 2 लहान चमचे, मीठ, तेल, लालसर टोमॅटो 2.

कृति –      टोमॅटो उकडत घाला. त्यावर थोडासा लिंबूरस पिळा. झाकण ठेवू नये. शिजल्यावर त्याचा रस काढून चाळणीतून 2-3 वेळा गाळून घ्या. मग रस गार झाल्यावर त्यात तांदूळ पीठ, तिखट, मीठ, साखर, आले कीस घाला व चांगले एकजीव मिश्रण तयार करा. मंद आचेवर तव्यावर अथवा फ्राय पॅनवर बेताची धिरडी घालून चांगली भाजून आवडत असेल तर एखादी कोरडी भाजी धिरड्यावर घालून ते गुंडाळून गरम गरम खावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा