सुवचनानि

‘देह देवाचे देऊळ । आत बाहेर निर्मळ ॥

देव पहावयासी गेलो । तेथे देवचि होऊन गेलो ॥

तुका म्हणे धन्य झालो । आम्ही विठ्ठलासी भेटलो॥

आरोग्य, मन:शांती, इच्छाशक्ति, आत्मिक बळ आणि ईश्‍वरप्राप्ती यासाठी नामस्म रणासासारखे साधन नाही. प्रपंच सुरुवातीला अतिशय गोड लागतो पण पुढे कमालीचा कटू, त्याच्या अगदी उलट नामस्मरण. सुरुवातीला फणसाची साले काढण्याइतके कंटाळवाणे वाटते एकदा गोडी लागली की आतल्या गरांची माधुरी अविटच!

सुविचार – वारा जोरात वाहू लागला की नासकी-कुजकी पाने खाली गळून पडतात. अंत:करणणात नामस्मरणाचा वारा जोरात वाहू लागला की पड्रिपूंनी निर्माण केलेले कुविचार क्षणात उडून जातात. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा