देव कुठे राहतो?

गोपाळरावांच्या दुकानात विनय कामाला लागला होता. दुकानात झाडू मारण्यापासून, पुड्या बांधून पैसे घेण्याचे कामही विनय चोख करीत असे. गोपाळरावांची महत्त्वाची इतर कामेही तो चुटकीसरशी करीत असे. त्यामुळे विनयवर त्यांची खास मर्जी बसली होती. एके दिवशी गोपाळराव काही कामानिमित्त विनयच्या जबाबदारीवर सारे दुकान सोडून दुसर्‍या गावी गेले. गिर्‍हाइकाची वाट पाहत विनय दुकानात बसला होता. इतक्यात कपडे फाटलेला, चेहर्‍यावर घामाच्या धारा आणि अंगाने काटकुळा असलेला एक म्हातारा दुकानाजवळ आला आणि थोडे धान्य देण्यासाठी विनयला विनवू लागला. विनयला दया आली. त्याने तांब्यातून पाणी आणून त्या म्हातार्‍याच्या हातावर गुळाचा खडा ठेवला आणि म्हणाला,

‘‘आजोबा, तुम्ही दमला आहात, तेव्हा आधी हा माझा पाहुणचार घ्या.’’ विनयने दिलेल्या तांब्यातील पाणी तो घटाघटा प्यायला आणि गुळाचा खडा तोंडात टाकत म्हणाला, ‘‘बाळा, आणखी थोडे उपकार माझ्यावर करशील तर माझ्या घरात चूल पेटेल. थोडं धान्य पाहिजे होतं. पण माझ्याकडे पैसे नाहीत.’’ ‘‘तुम्ही काळजी करू नका. मिळतील तेव्हा आणून द्या.’’ असे म्हणून विनयने पायलीभर तांदूळ त्याच्या मळक्या झोळीत टाकले. ‘‘बाळा, परमेश्‍वर तुला सुखात ठेवील,’’ असे म्हणत म्हातारा निघून गेला. मला सुखात ठेवणारा परमेश्‍वर कुठे बरे राहत असेल, याचा विचार करीत विनय दुकानात बसला असताना, लवकर काम संपवून परतलेले गोपाळराव पुढ्यात उभे राहिले तरी त्यांचे लक्ष नव्हते. ‘‘अरे विनय, कसला एवढा विचार करतोस? दुकानात काही भानगड तर झाली नाही ना?’’ गोपाळरावांच्या आवाजाने विनय भानावर आला.

‘‘नाही मालक. तसं सगळं ठीक आहे.’’ ‘‘मग असा गप्प का बसला होतास? खरं काय ते सांग.’’ ‘‘तुमची परवानगी न घेता एका म्हातार्‍याला मी पायलीभर तांदूळ फुकट दिले; तेव्हा जाताना ‘‘देव तुला सुखात ठेवेल’’, असं तो म्हणाला. पण कुठे राहतो हा देव?’’ विनयच्या बालिश आणि भोळसट प्रश्‍नाचे गोपाळरावांना हसू आले. ‘‘हे बघ विनय, प्रथम एक लक्षात ठेव, गिर्‍हाइकाच्या गरजा पूर्ण करून मिळालेल्या पैशानं आपला चरितार्थ आपल्याला चालवायचा आहे म्हणून मी दुकान थाटलंय. असा अधर्म पुन्हा करू नकोस. नाहीतर दुकान बंद करायची वेळ येईल. दुसरं, परमेश्‍वराबद्दल सांगायचं तर, तो या विश्‍वात सर्वत्र आहे. तेव्हा आता विचार करीत न बसता आपण जेवून घेऊ चल.’’ दोघांनी पोटभर जेवण केले. पण विनयने मात्र परमेश्‍वराचा शोध घेण्याचा ध्यासच घेतला. पुजार्‍याचे बोलणे खरे वाटून गावकर्‍यांनी विनयलाच बदडले आणि देवळाबाहेर हाकलले. त्याच्या बोलण्याबाहेर कोणीच लक्ष दिले नाही. विनय एका झाडाखाली बसला आणि विचार करू लागला. देवळातला देव खरा असता तर त्याने लबाड पुजार्‍यालाच शिक्षा केली असती. पण झाले उलटेच. लोकांनी मलाच चोर ठरवून बदडून काढले. देवाचा न्यायच उफराटा!

विनय दूरवर नजर लावून बसला असताना त्याच्या पुढ्यात एक चिमणी येऊन पडली. तिच्या पंखांत आणि पायांत दोर्‍याचा गुंता अडकल्यामुळे हालचाल करणे तिला कठीण झाले होते. विनयने जवळ जाऊन चिमणीला उचलले आणि हलक्या हाताने दोर्‍याचा गुंता काढून तिची सुटका केली. चिमणी भुर्रकन उडाली आणि झाडाच्या ढोलीत आपल्या पिल्लांबरोबर चिवचिव करू लागली. कौतुकाने विनयने ढोलीकडे पाहिले आणि मग तो पुढे चालू लागला. उपाशीपोटी चालण्याच्या श्रमाने त्याला ग्लानी आली आणि तो धाडकन रस्त्यात पडला. रस्त्याने एक वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करीत चालला होता. वाटेत पडलेल्या विनयला पाहून त्याने त्याला उचलले आणि गवताच्या गंजीवर ठेवले. तोंडावर पाणी मारून सावध केले. वारकर्‍याने स्वतःजवळची भाजीभाकरी त्याला खायला दिली. विनयला आता जरा बरे वाटले. ‘‘बाळ, कोण तू? कुठे चाललास?’’ ‘‘बुवा, गोपाळरावांच्या दुकानात मी कामाला असतो. देवाचा शोध घ्यायला निघालो आहे. कुठे राहतो देव?’’ असे विचारून दिवसभरात घडलेली सारी हकीकत विनयने वारकर्‍याला ऐकवली. त्याचे बालिश बोलणे ऐकून वारकरी हात जोडीत म्हणाला, ‘‘विठ्ठला, परमेश्‍वरा, तुझी लीला अगाध आहे. बाळा, परमेश्‍वर तुला भेटला आहे. तुझ्या अंतःकरणातच आहे. तुझ्या हातून झालेल्या चांगल्या कामांतच परमेश्‍वर सामावला आहे. नेहमी असाच वागत राहा. त्या लबाड पुजार्‍याला परमेश्‍वरच शिक्षा करेल, तू काळजी करू नकोस. पुन्हा आपल्या कामाला लाग.’’ असे म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत वारकरी निघून गेला. वारकर्‍याच्या शब्दांतून विनयला देव सापडला. संध्याकाळ होताना विनय गोपाळरावांच्या दुकानी आला.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा