मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – औषध देऊन गुन्हेगारांना खरे बोलायला भाग पाडता येत नाही का?

गुन्हेगार महाबिलंदर असतात. पोलिसांचा मार खाऊनही ते खरे बोलत नाहीत. त्यामुळे कैक वेळा गुन्ह्यांचा शोध लागायला अडचण येते. वैद्यकशास्त्राने एवढी प्रगती केलीय, मग औषध देऊन गुन्हेगाराला खरे बोलायला भाग पाडता येते का? हा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. खरेच असे औषध असेल तर किती बरे होईल. आपल्या मित्रांमध्ये भांडणे कोणी लावली, सरांच्या अंगावर बाण कोणी मारला, शाम अभ्यासाला मित्राकडे गेला होता की पिक्चर पाहायला, अशा यक्षप्रश्‍नांची उत्तरे त्यामुळे सहजगत्या मिळाली असती! पण खरेच असे औषध आहे? हायोस्कायमस नायजर नावाचे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळते. त्यापासून मिळणार्‍या हायोसीन या औषधाचा ट्रूथ सिरम वा खोटे उघडकीस आणणारे औषध म्हणून उपयोग केला जातो. हे औषध व्यक्तीला दिल्यास ती व्यक्ती अर्धवट जागी, तर अर्धवट निद्रीस्त अवस्थेत असते. त्यामुळे या अवस्थेत तिच्याशी प्रश्‍नोत्तरे केली असता ती व्यक्ती सत्य लपवून ठेवू शकत नाही. कारण तिचे तिच्या मेंदूवर नियंत्रण राहिलेले नसते. त्यामुळे गुन्ह्यांचा शोध लागू शकतो. असे आहे हे ट्रूथ सिरम अर्थात हायोसीन.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा