पाकातले चिरोटे

साहित्य  –    1 कप रवा, खायचा रंग, 1 टेस्पून तेल मोहनासाठी, चिमुटभर मीठ, 4 टेस्पून वितळलेले तूप, 3 टेस्पून कॉर्न फ्लोअर पाक : 1 कप साखर, 1/2 कप पाणी, गोळीबंद पाक करावा

कृती     –     रव्यामध्ये 1 टेस्पून कडकडीत गरम तेल घालावे. चिमूटभर मीठ घालावे. अंदाज घेउन पाणी घालावे आणि थोडा घट्ट असा गोळा भिजवावा. 2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.

2 तासांनी भिजवलेल्या गोळ्याचे 3 सारखे भाग करावे. एक गोळ्यात गुलाबी आणि एक गोळ्यात पिवळा रंग घालून नीट मळून घ्या. एक गोळा कोणताही रंग न घालता तसाच ठेवा.प्रत्येक गोळ्याची एकदम पातळ पोळी लाटावी. पोळीतून खालचा पोळपाट दिसला पाहिजे इतपत पातळ लाटावी. 3 टेस्पून तूप वितळवून त्यात 3 टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पातळसर पेस्ट बनवा.1 लाटलेली पोळी घेऊन त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेऊन या पोळीवर पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट लावावी. एका बाजूने गुंडाळी करत मध्यभागी आनून घट्ट रोल बनवावा. अशाच उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवा.साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. रोलचे 1/2 इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून छोटीशीच पुरी/चिरोटे बनवा. तयार चिरोटे तेलात मंद आचेवर बदामी रंगावर तळून घ्या. चिरोटा कोमट झाल्यावर साधारण गरम असलेल्या पाकात घाला. मिनिटभर ठेवून बाहेर काढा. आणि उभा करून ठेवा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा