आयुर्वेदीय बालसंस्कार – बालकांचे आजार

ज्या व्याधीमध्ये स्मरणशक्ती व पूर्वी घेतलेल्या अनुभवांचा नाश होतो व स्मृती कमी होते. त्या व्याधीस अपस्मार असे म्हणतात. चरकाचार्यांनी स्मृतिनाशाबरोबरच बुद्धी व सत्त्व यांची विकृती होऊन विकृत हालचाली करीत रुग्ण मुर्च्छित हातो, त्याला अपस्मार असे म्हटले आहे. व्यावहारिक भाषेत यालाच झटके येणे, फेफरे येणे असे म्हणतात. जन्म होताना नकळत मेंदूला मार लागणे, शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होणे, कॅल्शिअमची कमतरता असणे, मेंंदूत ताप येणे, जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात होणे, काम, भीती, क्रोध, शोक यांचा मनावर विकृत परिणाम होणे, मनोदोष वाढून रज व तम या गुणांची वाढ होणे, यामुळे अपस्मार व्याधी निम र्ाण होते. डोळ्यांसमोर अंधारी येणे, तोंडाला फेस येणे, शरीराच्या हालचालीत अचानक विकृती होणे, हातापायांच्या विक्षिप्त हालचाली करणे, मूर्च्छित होत असताना चित्रविचित्र दृश्य दिसणे, भुवया व डोळे यांच्या विचित्र हालचाली करणे, ज्या वेळी फेकरे येतात, त्या वेळी वर्तमान व भूतकाळ अशा दोन्ही वेळेचे ज्ञान नष्ट होणे होते.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा