उपदेश

एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्या गावातील मुख्य व्यक्ती बुद्धांना पसंत करत नसे. जेव्हा त्याला माहिती झाले की, बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावात येत आहे तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्या व्यक्तिच्या स्वभावाला ओळखून होते. मार्गात जेव्हा त्याचे घर आले तेव्हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती नाराज झाला आणि म्हणू लागला,’’ तुम्ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते. त्याचे बोलणे संपल्यावर बुद्ध म्हणाले,’’ माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्या घरी येऊन जर काही खाण्यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्यानंतरही तो ते न स्वीकारताच निघून गेला तर तुम्ही त्या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्यक्ती म्हणाली, ’’मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्हा बुद्ध म्हणाले,’’ त्या दशेनुसार आपले सामान आपल्याजवळच राहिले ना? त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली आणि बदल्यात आपण आम्हाला अपशब्द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्द आम्ही अस्वीकार केले. त्यामुळे ते तुमच्याजवळच राहिले.’’ मुख्य व्यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्याने क्षमा मागितली. तो त्यांचा शिष्य बनला.

तात्पर्य – उग्रपणाने वागल्यास होणार्‍या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा